Manish Jadhav
एकदा तरी गोव्याला जावून यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. गोव्याच्या निसर्ग सौंदर्यासह येथील फेस्टिव्हल, मार्केट्स आणि नाईटलाईफ प्रत्येकाला खुणावते.
तुम्ही गोव्याला सुट्ट्या एन्जॉय करण्याचा प्लॅन करत असाल आणि इथे आल्यानंतर कुठे शॉपिंग करायची याबद्दल विचार करता असाल चिंता करु नका... खालील ठिकाणांना नक्की भेट द्या.
हे मार्केट गोव्यातील लोकप्रिय आणि उत्तम खरेदीचे ठिकाण आहे. अंजुना बीचवरील या मार्केटमध्ये पर्यटक मोठी गर्दी करतात.
पणजी मार्केटमध्ये तुम्ही येथे मसाले, लोणचे, फळे, भाज्या, ताजे मासे, काजू, पोर्ट वाईन आणि करी पेस्ट खरेदी करु शकता. तसेच वाजवी किमतीत कपडे, दागिने आणि इतर वस्तू देखील खरेदी करु शकता.
आरपोरा मार्केट संध्याकाळी सुरु होते आणि रात्री उशिरापर्यंत चालते. स्थानिकांसह परदेशी पर्यटकांनी मार्केट फुलून जाते.
गोव्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे कलंगुट मार्केट स्क्वेअर जिथे तुम्हाला कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत सर्व काही मिळते. कलंगुट समुद्रकिनारा अनेक शॅक आणि स्टॉल्सने नटलेला आहे.