South Goa Loksabha Result: ‘’मोदींचा हा नैतिक पराभव’’- विरियातो फर्नांडिस

Manish Jadhav

लोकसभा निवडणूक 2024

यंदाची लोकसभा निवडणूक खूप खास राहिली. गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्याचा भाजपचा मानस होता. मात्र दक्षिण गोव्यातून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. तर उत्तर गोव्यात भाजप विजयी झाला.

Viriato Fernandes | Dainik Gomantak

दक्षिण गोव्यात विरियातोंना घवघवीत यश

दक्षिण गोव्यातील लढतीत काँग्रेसच्या विरियातो फर्नांडिस यांचा 14,703 मतांनी विजय झाला. विरियातो यांना 2,15,672 एवढी मते मिळाली तर भाजपच्या पल्लवी धेंपे यांना 2,00,969 एवढी मते मिळाली.

Viriato Fernandes | Dainik Gomantak

विरियातो यांची सुरुवातीपासूनच आघाडी

विरियातो यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली. धेंपे पिछाडीवर राहिल्या. पण, निकालाने हादरलेल्या भाजपने दक्षिण गोव्यात फेरमतमोजणीची मागणी केली. मात्र त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली.

Viriato Fernandes | Dainik Gomantak

विरियातो यांचा विजयी जल्लोष

आघाडीवर असणाऱ्या विरियातो यांच्यासह काँग्रेस व घटक पक्षाच्या नेत्यांनी मोठा जल्लोष केला. विरियातो यांनी गोंयकारांचे आभार मानले.

Viriato Fernandes | Dainik Gomantak

पाच पांडवांनी कौरवांचा पराभव

आज पाच पांडवांनी कौरवांचा पराभव केलाय, आजचा विजय मनी पॉवर विरोधात लोकांचा विजय असल्याचे विरियातो म्हणाले.

Viriato Fernandes | Dainik Gomantak

मोदींनी प्रचारसभा घेतली होती

गोव्यातील दोन्ही उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारसभा घेतली होती. मात्र भाजपला दक्षिण गोव्याची जागा राखता आली नाही.

PM Narendra Modi | Dainik Gomantak

मोदींचा हा नैतिक पराभव

मोदींचा हा नैतिक पराभव असल्याचा उल्लेख यावेळी विरियातो यांनी केला. मनी पॉवरचा पीपल पॉवरने पराभव केल्याचे विरियातो म्हणाले.

Viriato Fernandes | Dainik Gomantak

मोदींनी धेंपेना निवडून देण्याची साद घातली

भाजपने पल्लवी धेंपे यांना उमेदवारी जाहीर करत सर्वात जास्त लक्ष याच जागेवर दिले होते. मोदींनी विरियातो आणि काँग्रेसवर सडकून टीका करत धेंपे यांना मतदान करण्याची मागणी केली होती.

PM Narendra Modi | Dainik Gomantak

दक्षिणेत अल्पसंख्याक मतदारांचा जलवा

दक्षिणेत अल्पसंख्याक मतदारांचा जलवा दिसून आला. याचा सर्वाधिक फायदा विरियातो यांना झाला.

Viriato Fernandes | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pallavi Dempo | Dainik Gomantak