Ganeshprasad Gogate
छोटीशी डुलकी घेणे तुम्हाला दिवसभर प्रसन्न ठेवण्यास मदत करेल मात्र वामकुक्षी घेण्याच्या सवयीमुळे तुमच्या रात्रीच्या झोपेचे चक्र मात्र बिघडून, परिणामी दुसऱ्या दिवशी तुम्ही निरुत्साही रहाल.
रात्रीचे जेवण भरपेट व अतिमसालेदार देखील असू नये. यांमुळे पित्त व पचनाचे विकार होऊन रात्रीची झोप बिघडू शकते.
झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे झोप येण्यास मदत होते हा चुकीचा समज आहे. मद्यपानामुळे तुम्हाला झोप आली तरीही ती सुखकारक झोप नसून यामुळे तुम्हाला रात्री सारखी जाग येईल.
पोट स्वच्छ होण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी पिणे हे हितावह आहे. मात्र रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी प्यायल्याने मुत्रविसर्जनासाठी वारंवार उठावे लागल्यामुळे झोपमोड होऊ शकते .
झोपण्यापूर्वी अनावश्यक गोष्टींचा विचार करत बसणे , चिंता करत राहणे यामुळे तुमची झोप कमी होऊ शकते. झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास अगोदर चिंता व विचार करत बसणे टाळा .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.