चहा आवडतो ना? मग या हिवाळ्यात 'हा' चहा एकदा try करून बघा

Ganeshprasad Gogate

पचनक्रियेसंबंधी समस्या:-

लवंगाचा चहा पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्यास फायदेशीर आहे. लवंगीचा चहा पचनक्रिया चांगली करतो आणि एसिडिटी कमी करतो.

Clove Tea | Dainik Gomantak

दातांचं दुखणं:-

ज्या लोकांना दातांमध्ये वेदना होण्याची समस्या असते, त्यांना हा चहा आवर्जून घ्यावा. यात एन्टी-बॅक्टेरिअल गुण असतात. लवंगाचं तेल दातांच्या वेदना दूर करण्यासाठी फार फायदेशीर आहे.

Clove Tea | Dainik Gomantak

संधीवात:-

जर तुम्ही संधीवाताच्या वेदनांनी हैराण झाले अशाल तर लवंगाचा चहा तुम्हाला आराम देऊ शकतो. यात असलेल्या एनाल्जेरसिक तत्वांमुळे सांधेदुखी, मांसपेशीमध्ये वेदना आणि सूज कमी केली जाते.

Clove Tea | Dainik Gomantak

डोकेदुखी:-

डोकेदुखी होत असेल तर लवंग बारीक करुन लगेच कपाळावर लावल्यास फायदा होतो. लवंगाचं तेलही डोकेदुखी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. खोबऱ्याच्या तेलात लवंगाच्या तेलाचे काही थेंब मिश्रित केल्यास लगेच आराम मिळेल.

Clove Tea | Dainik Gomantak

तोंडाची दुर्गंधी:-

लवंगाची चहा प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते. यात आढळणारे पोषक तत्व तोंडाच्या दुर्गंधीशिवाय हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या दूर करण्यास मदत करते.

Clove Tea | Dainik Gomantak

कसा कराल चहा:-

लवंगाचा चहा तयार करण्यासाठी चार ते पाच लवंग उकडून घ्या. यात मध मिश्रित करुन दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करा. याने अस्थामाच्या रुग्णांना फायदा होतो.

Clove Tea | Dainik Gomantak
Dates | Dainik Gomantak