गोव्यातील धबधबे पाहण्यासाठी जाताय? थांबा, तुम्हाला होऊ शकते अटक!

Pramod Yadav

धबधबे, नदीवर जाण्यास मज्जाव

पावसाळ्यात गोवा वनक्षेत्रातील धबधबे तसेच इतर पाणथळ जागी जाण्यास किंवा पोहण्यास वन खात्याने मज्जाव केलाय.

अटकेची तरतूद

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्यासह प्रसंगी अटक होऊ शकते.

एक लाखापर्यंत दंड

तसेच, एक लाख रुपयांपर्यंत दंडही भरावा लागू शकतो, अशी तरतूद करण्यात आली आहे.

दुर्घटनांमुळे बंदी

नदी आणि धबधब्यांवर होणाऱ्या दुर्घटनांमुळे ही बंदी लागू करण्यात आली आहे.

वाहून जाण्याचे प्रकार

अनेकदा जलप्रवाहांमध्ये उतरलेले लोक वाहून जाण्याचे प्रकारही घडले आहेत.

६ जूनपासून बंदी

खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाने ६ जूनपासून सर्व संरक्षित क्षेत्रांमधील नद्या आणि धबधब्यांमध्ये जाण्यास बंदी घातलीय.

अनेकांचा बळी

गेल्यावर्षी सांगे, सत्तरी येथे पोहायला गेलेल्या १५ ते २० जणांना जीव गमवावा लागला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखी पाहण्यासाठी