Manish Jadhav
मॉन्सूनमध्ये तुम्ही ट्रीप प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी गोवा डेस्टिनेशन लय उत्तम आहे. पावसाळ्यात गोव्यात फिरायची मजा काही औरचं...
पावासाळ्यात गोव्याचं निसर्ग सौंदर्य तुमचं स्वागत करतं. येथील धबधबे तुम्हाला स्वर्ग सुख देऊन जातात. पावसाळ्यात तुम्ही आवर्जून येथील धबधबे पाहिले पाहिजेत. चला तर मग याविषयी जाणून घेऊया...
तुम्हाला गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्याविषयी तर माहिती असेलच. पण पावसाळ्यात तुम्ही दूधसागर व्यतरिक्त हरवळे धबधबा, हिवरे धबधबा, तांबडी सुरला धबधबा, नेत्रावली धबधबा हे प्रसिद्ध धबधबे पाहू शकतात.
वाळपईमधील हा लोकप्रिय धबधबा आहे. हा धबधबा निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना आकर्षित करतो. तुम्ही नक्की हा धबधबा पाहा. पावसाळ्या व्यातिरिक्त तुम्ही वीकेंडलाही यास भेट देऊ शकतात.
उत्तर गोव्यातील सर्वात सुंदर धबधब्यांमध्ये तांबडी सुर्ला धबधब्याची गणना होते. सुंदर समुद्रकिनारे आणि तांबडी सुर्ला धबधबा हे उत्तर गोव्याचे शान आहेत. नैसर्गिक सौंदर्य आहे.
दूधसागर धबधबा हा भारतातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे. गोवा कर्नाटक सीमेवर हा धबधबा आहे. हा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो. तुम्ही इथे भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यालाही भेट देऊ शकतात.
पावसाळ्यात हरवळे धबधबा तुमच्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरु शकतो. हरवळे धबधब्याव्यतरिक्त तुम्ही येथील रुद्रेश्वर मंदिराला भेट देऊ शकतात.
211 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेला नेत्रावली धबधबा पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे. नेत्रावली धबधबा सर्व निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. हा उत्तर गोव्यातील सर्वात सुंदर धबधबा आहे.
पश्चिम घाटातील हा धबधबा गोव्यासह महाराष्ट्र आणि नजिकच्या कर्नाटक राज्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पावसाळ्यातील या धबधब्याचे रौद्र रुप अचंबित करायला लावतं.
आंबोली जवळील कावळेसाद पॉईंट या ठिकाणचा उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.