Night Routine Glass Skin: तरुण आणि तुकतुकीत त्वचा हवीय? रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' सोपा फेशियल मसाज

Manish Jadhav

क्लिंजिंगनंतर योग्य सीरम

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन कोरडा करा. त्यानंतर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑइल, बदामाचे तेल किंवा व्हिटॅमिन ई सीरम लावा, जेणेकरुन मसाज करताना बोटांची त्वचा कोरडी पडणार नाही.

Night Routine Glass Skin | Dainik Gomantak

हलक्या हाताने मसाज करा

चेहऱ्याला मसाज करताना नेहमी बोटांच्या हलक्या (विशेषतः अनामिका किंवा मधल्या) बोटांचा वापर करा. कपाळ आणि गालांवर हलक्या हताने मसाज करा.

Night Routine Glass Skin | Dainik Gomantak

मानेपासून वरच्या दिशेने करा मसाज

सुरकुत्या केवळ चेहऱ्यावरच नाही तर मानेवरही दिसतात. त्यामुळे मानेपासून सुरुवात करुन वरच्या दिशेने हलक्या हाताने मसाज करा.

Night Routine Glass Skin | Dainik Gomantak

डोळ्यांखालील भागाची विशेष काळजी

डोळ्यांखालील त्वचा अत्यंत पातळ आणि संवेदनशील असते. त्यामुळे अनामिका बोटाने डोळ्यांच्या कढाभोवती अत्यंत हलक्या हाताने मसाज करा, ज्यामुळे फाईन लाईन्स आणि डार्क सर्कल कमी होतात.

Night Routine Glass Skin | Dainik Gomantak

कपाळावरील सुरकुत्या घालवण्याची पद्धत

कपाळावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी बोटे कपाळाच्या मधोमध ठेवून दोन्ही बाजूंना तणाव मुक्तीच्या दिशेने हलक्या हाताने मसाज करा. यामुळे स्नायूंना आराम मिळतो.

Night Routine Glass Skin | Dainik Gomantak

ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी ‘टॅपिंग’ पद्धत

मसाज झाल्यानंतर हाताच्या बोटांच्या टोकांनी चेहऱ्यावर हलके टॅपिंग करा. यामुळे चेहऱ्याचा रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचेच्या पेशींना ऑक्सिजन मिळून चमक वाढते.

Night Routine Glass Skin | Dainik Gomantak

स्वच्छ मऊ कपड्याने चेहरा पुसा

मसाज केल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी चेहऱ्यावर राहिलेले सीरम एका स्वच्छ मऊ कपड्याने पुसून घ्या, जेणेकरुन रंध्रे (Pores) बंद होणार नाहीत.

Night Routine Glass Skin | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखी बघा