Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

Manish Jadhav

पुरंदरचा थरार

इ.स. 1665 मध्ये मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने पुरंदर किल्ल्याला भयंकर वेढा घातला होता. मराठ्यांच्या इतिहासातील ही सर्वात घनघोर लढाई ठरली.

Purandar Fort | Dainik Gomantak

मुरारबाजी देशपांडे यांचे अफाट शौर्य

पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांनी केवळ 700 मावळ्यांना सोबत घेऊन मुघलांवर हल्ला चढवला. त्यांच्या तुफानी तलवारीच्या माऱ्याने मुघल सैन्यात मोठी घबराट पसरली होती.

Purandar Fort | Dainik Gomantak

वज्रगडाचे पतन अन् पुरंदरचा वेढा

मुघलांनी पहिल्यांदा पुरंदरच्या पाठीशी असलेल्या 'वज्रगड' या उपकिल्ल्यावर तोफांचा भडीमार करुन ताबा मिळवला. वज्रगड हातात गेल्यावर मुघलांनी थेट पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर तोफांचा रोख लावला.

Purandar Fort | Dainik Gomantak

दिलेरखान अन् मुरारबाजींचा सामना

छातीठोकपणे लढणाऱ्या मुरारबाजींचे शौर्य पाहून खुद्द दिलेरखान थक्क झाला आणि त्याने मुरारबाजींना मुघल सैन्यात येण्याची ऑफर दिली. पण स्वराज्याशी निष्ठा राखत मुरारबाजींनी ती ऑफर धुडकावून लावली आणि लढत राहिले.

Purandar Fort | Dainik Gomantak

स्वामीनिष्ठेसाठी मुरारबाजींना वीरमरण

दिलेरखानाने कपटाने चालवलेला तीर मुरारबाजींच्या कंठात बसला आणि हा पराक्रमी वीर धारातीर्थी पडला. मावळा पडला तरी मराठ्यांनी हार न मानत बालेकिल्ल्याचा बचाव सुरुच ठेवला.

Purandar Fort | Dainik Gomantak

शिवरायांचे धोरणी राजकारण अन् 'पुरंदरचा तह'

मावळ्यांचा जीव आणि स्वराज्याचे होत असलेले अतोनात नुकसान रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तहाचा मार्ग निवडला. यातूनच ऐतिहासिक 'पुरंदरचा तह' झाला, ज्यामध्ये महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले.

Purandar Fort | Dainik Gomantak

इतिहासातील अमर बलिदान

पुरंदरची लढाई ही केवळ जय-पराजयाची नसून ती मावळ्यांच्या असीम स्वामीनिष्ठा आणि बलिदानाची अमर गाथा आहे. मावळ्यांच्या याच बलिदानातून पुढे हिंदवी स्वराज्याची गुढी पुन्हा समर्थपणे उभारली गेली.

Purandar Fort | Dainik Gomantak
आणखी बघा