Manish Jadhav
सफरचंद (Apple) हे आरोग्यासाठी उत्तम असले तरी, काही विशिष्ट परिस्थितीत किंवा अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
सफरचंदात जास्त फायबर (तंतुमय पदार्थ) असल्याने, ते जास्त खाल्ल्यास पोट फुगणे आणि गॅस होण्याची समस्या वाढू शकते.
सफरचंद ॲसिडिक (आम्लधर्मी) असते. ते खाल्ल्यानंतर लगेच दात न घासल्यास दातांचे इनॅमल खराब होऊन किडण्याची शक्यता वाढते.
सफरचंदांमध्ये नैसर्गिक साखर (Natural Sugar) आणि कॅलरीज असतात. दिवसातून 4-5 पेक्षा जास्त सफरचंद खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होऊ शकते.
काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, विशेषतः ज्यांना बर्च परागकणांची (Birch Pollen) ॲलर्जी आहे, त्यांना सफरचंद खाल्ल्यास तोंडात खाज किंवा ॲलर्जीची लक्षणे दिसू शकतात.
सफरचंदांमध्ये फ्रुक्टोज आणि पॉलीओल्स (Polyols) जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे IBS (Irritable Bowel Syndrome) असलेल्या लोकांना जुलाब किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
सफरचंदाच्या बियांमध्ये अमिग्डालिन नावाचा विषारी घटक असतो, जो पचनानंतर सायनाईड तयार करु शकतो. बिया चुकीने जास्त प्रमाणात खाल्ल्यास विषबाधेचा धोका असतो.
जर तुम्ही फक्त सफरचंद खाऊन आहार नियंत्रित केला, तर शरीराला प्रथिने (Protein) आणि अन्य आवश्यक चरबी (Fats) मिळू शकत नाहीत, ज्यामुळे पोषक तत्वांमध्ये असंतुलन निर्माण होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.