Manish Jadhav
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषक जिंकला आणि इतिहास रचला.
अंतिम सामन्यात दीप्ती शर्माने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत कमाल केली. तिने 58 धावा आणि 5 बळी घेतले.
पुरुष किंवा महिला वनडे नॉकआउट सामन्यात अर्धशतक (50+ धावा) आणि 5 बळी घेणारी दीप्ती शर्मा पहिली खेळाडू ठरली.
दीप्ती शर्माने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक 22 बळी घेतले आणि गोलंदाजीत आपला दबदबा सिद्ध केला.
संपूर्ण स्पर्धेत 215 धावा (3 अर्धशतके) आणि 22 विकेट्सच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे दीप्ती शर्माला हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला.
अंतिम सामन्यात स्मृती मानधना (87 धावा) आणि शेफाली वर्मा (2 बळी) यांनी पहिल्या विकेटसाठी 104 धावांची मजबूत भागीदारी करत मोठ्या स्कोअरचा पाया रचला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 298 धावा केल्या, जो अंतिम सामन्यातील एक मोठा आणि विजयी स्कोअर ठरला.