Manish Jadhav
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असलेला दिवेआगरचा समुद्रकिनारा त्याच्या शुभ्र वाळू आणि स्वच्छ पाण्यासाठी ओळखला जातो. सुमारे 4 ते 5 किलोमीटर लांब पसरलेला हा किनारा पर्यटकांना भुरळ घालतो.
या किनाऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील सुरुच्या (Casuarina) झाडांची दाट रांग. या झाडांच्या सावलीत बसून समुद्राच्या लाटांचा आनंद घेणे हा एक सुखद अनुभव असतो.
पोहण्यासाठी हा किनारा अत्यंत सुरक्षित मानला जातो. पाण्याचा प्रवाह संथ असल्याने मुले आणि कुटुंबीयांसोबत समुद्रात डुबकी मारण्याचा आनंद मनसोक्त लुटता येतो.
साहसी पर्यटकांच्या आवडीसाठी येथे बनाना राईड, जेट स्की, बंपर राईड आणि पॅरासेलिंग यांसारखे विविध वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत.
दिवेआगरमध्ये आल्यावर घरगुती होमस्टे आणि अस्सल कोकणी थाळीचा आस्वाद नक्की घ्यावा. विशेषतः उकडीचे मोदक, ताजी मासळी आणि सोलकढी येथील खासियत आहे.
दिवेआगरला आल्यावर तुम्ही जवळच असलेल्या श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि मुरुड जंजिरा किल्ल्यालाही भेट देऊ शकता. हे सर्व भाग एका दिवसाच्या सहलीत फिरता येतात.
पुणे आणि मुंबईपासून जवळ असूनही, हे ठिकाण आजही शांत आणि प्रदूषणमुक्त आहे. विकेंड ट्रिपसाठी किंवा मानसिक शांततेसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
दिवेआगर हे गाव एकेकाळी 'सुवर्ण गणेशा'साठी जगप्रसिद्ध होते. 1997 मध्ये एका बागेत खोदकाम करताना सोन्याचा मुखवटा सापडला होता. सध्या मंदिरात गणपतीची नवीन मूर्ती असली, तरी भक्तांची श्रद्धा आजही तितकीच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.