Devkund Waterfall: तीन नद्यांचा संगम अन् 300 फुटांवरुन कोसळणारं पाणी, सह्याद्रीच्या कुशीतील छुपा खजिना 'देवकुंड' धबधबा; इथे देव स्नान करायला यायचे

Manish Jadhav

निसर्गाचा छुपा खजिना

देवकुंड धबधबा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील भिरा (माणगाव जवळ) गावाजवळ एका घनदाट जंगलात लपलेला आहे. सह्याद्रीच्या कुशीतील हा एक अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य धबधबा आहे.

devkund waterfall | Dainik Gomantak

'देवकुंड' नावाचा रंजक इतिहास

स्थानिक मान्यतेनुसार, या कुंडात पूर्वी देव स्नान करण्यासाठी येत असत, म्हणूनच याला 'देवकुंड' (देवांचे कुंड) असे नाव पडले. या पाण्याचा उगम कुंडलिका नदीतून होतो.

devkund waterfall | Dainik Gomantak

तीन नद्यांचा संगम

असे मानले जाते की, कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या तीन प्रमुख नद्यांचा प्रवाह एकत्र येऊन हा भव्य धबधबा तयार होतो. सुमारे 150 ते 300 फूट उंचीवरुन कोसळणारे पांढरेशुभ्र पाणी पर्यटकांना भुरळ पाडते.

devkund waterfall | Dainik Gomantak

थरारक जंगल ट्रेकिंग

धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी भिरा गावांमधून साधारणपणे 5 ते 6 किलोमीटरचे ट्रेकिंग करावे लागते. घनदाट जंगल, छोटे ओढे आणि उथळ पाण्यातून वाट काढत जाणारा हा ट्रेक ट्रेकर्ससाठी अत्यंत थरारक ठरतो.

devkund waterfall | Dainik Gomantak

पाण्याचा पारदर्शक रंग

देवकुंड धबधब्याचे मुख्य आकर्षण म्हणजे जिथे हे पाणी कोसळते, ते कुंड अतिशय स्वच्छ आणि गडद निळ्या रंगाचे दिसते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यानंतर हे पाणी इतके पारदर्शक असते की कुंडाचा तळही स्पष्ट दिसतो.

devkund waterfall | Dainik Gomantak

भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ

देवकुंडला भेट देण्यासाठी पावसाळ्याच्या शेवटी (सप्टेंबर ते नोव्हेंबर) आणि हिवाळा हा काळ सर्वोत्तम मानला जातो. अति पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव हा धबधबा प्रशासनातर्फे पर्यटकांसाठी अनेकदा बंद ठेवला जातो.

devkund waterfall | Dainik Gomantak

सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक

देवकुंड धबधब्याचे कुंड मध्यभागी अत्यंत खोल आणि धोकादायक आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि स्थानिक गाईड्सनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, तसेच कुंडाच्या जास्त खोल पाण्यात न उतरणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.

devkund waterfall | Dainik Gomantak

orchha Fort: जगातील एकमेव ठिकाण! जिथे प्रभू रामाला देव नाही तर 'राजा' मानून पोलीस देतात 'गार्ड ऑफ ऑनर'; इतिहासप्रेमींचं स्वर्ग 'ओरछा'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखी बघा