Orcha Fort: जगातील एकमेव ठिकाण! जिथे प्रभू रामाला देव नाही तर 'राजा' मानून पोलीस देतात 'गार्ड ऑफ ऑनर'; इतिहासप्रेमींचं स्वर्ग 'ओरछा'

Manish Jadhav

बुंदेला राजघराण्याची शान

ओरछा किल्ल्याची स्थापना 16व्या शतकात बुंदेला राजवंश प्रमुख राजा रुद्र प्रताप सिंग यांनी केली. बेतवा नदीच्या काठावर वसलेला हा किल्ला बुंदेला राजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देतो.

orchha Fort | Dainik Gomantak

एकाच किल्ल्यात तीन महाल

हा केवळ एक किल्ला नसून, यात राजा महाल, जहांगीर महाल आणि शशिशेखर महाल (राई प्रवीण महाल) अशा तीन भव्य महालांचा समावेश आहे. प्रत्येक महालाची वास्तुकला अद्वितीय आहे.

orchha Fort | Dainik Gomantak

राजा आणि मुघल सम्राटाची मैत्री

किल्ल्यातील 'जहांगीर महाल' हा मुघल सम्राट जहांगीरच्या केवळ एका रात्रीच्या मुक्कामासाठी राजा वीरसिंग देव यांनी बांधला होता. हा महाल बुंदेली आणि मुघल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

orchha Fort | Dainik Gomantak

रामाची 'राजा' म्हणून पूजा

ओरछा हे जगातील एकमेव असे ठिकाण आहे, जिथे प्रभू रामाला देव म्हणून नाही तर 'राजा' म्हणून पूजले जाते. किल्ल्याच्या परिसरात असलेल्या राम राजा मंदिराला दररोज मध्य प्रदेश पोलिसांतर्फे 'गार्ड ऑफ ऑनर' (सलामी) दिला जातो.

orchha Fort | Dainik Gomantak

अप्रतिम भित्तीचित्रे

किल्ल्याच्या अंतर्गत भिंतींवर आणि छतावर पौराणिक कथा, रामायण आणि महाभारतातील प्रसंग रेखाटणारी अत्यंत सुंदर भित्तीचित्रे आहेत. शतकांनंतरही या चित्रांचे नैसर्गिक रंग आजही टिकून आहेत.

orchha Fort | Dainik Gomantak

नर्तकी राई प्रवीणची कथा

किल्ल्यातील 'राई प्रवीण महाल' हा राजा इंद्रमणी यांनी त्यांची परम सुंदरी आणि प्रतिभावान नर्तकी राई प्रवीण हिच्यासाठी बांधला होता. मुघल सम्राट अकबरालाही राई प्रवीणच्या बुद्धिमत्तेपुढे झुकावे लागले होते, असा याचा इतिहास आहे.

orchha Fort | Dainik Gomantak

छुप्या वाटा आणि भुयारी मार्ग

युद्धकाळात शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी आणि सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी ओरछा किल्ल्यात अनेक गुप्त भुयारी मार्ग आणि तळघरे बांधण्यात आली होती, जी आजही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत.

orchha Fort | Dainik Gomantak
आणखी बघा