Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
या हंगामातील पहिलाचा सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्स घरच्या मैदानात म्हणजेच चेन्नईमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध खेळणार आहे.
आयपीएलच्या या 17 व्या हंगामासाठी आता चेन्नई सुपर किंग्सने तयारी सुरू केली आहे.
चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सचा ट्रेनिंग कॅम्प मार्चच्या पहिल्याच आठवड्यात सुरू झाला आहे.
या ट्रेनिंग कॅम्पसाठी चेन्नई संघातील अनेक खेळाडू चेन्नईत दाखल झाले आहेत. यामध्ये ऋतुराज गायकवाड, मुरेश चौधरी, दीपक चाहर अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
दरम्यान, अद्याप चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी संघाशी जोडला गेलेला नाही. पण तोही लवकरच चेन्नईत येऊ शकतो.
तसेच अजून परदेशी खेळाडूही या ट्रेनिंग कॅम्पमध्ये अद्याप जोडलेले नाहीत, ते देखील पुढील काही दिवसात चेन्नईमध्ये येण्याची शक्यता आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा यंदा सहाव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न असेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.