IPL 2024: 'डर्बन से आया दोस्त...', लखनऊच्या ताफ्यात दिग्गजाची एन्ट्री

Pranali Kodre

लखनऊ सुपर जायंट्सची महत्त्वाची घोषणा

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने महत्त्वाची घोषणा केली आहे.

LSG Coaching Staff | X/LucknowIPL

डर्बनसे आया हमारा दोस्त...

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू लान्स क्लुजनरला कोचिंग स्टाफमध्ये सामील केले आहे. त्यांच्या नियुक्तीची घोषणा करताना लखनऊ फ्रँचायझीने सोशल मीडिया पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'डर्बनसे आया हमारा दोस्त' असं लिहिले आहे.

Lance Klusener | LSG Post | X/LucknowIPL

सहाय्यक प्रशिक्षक

49 कसोटी आणि 171 वनडे खेळलेल्या क्लुजनर लखनऊ सुपर जायंट्सचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून आयपीएल 2024 मध्ये जबाबदारी सांभाळेल.

Lance Klusener | X/ICC

कोचिंग स्टाफ

लखनऊ संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आहेत, तर सहाय्यक प्रशिक्षक एस श्रीराम आहेत. त्यामुळे क्लुजनर त्यांच्यासह काम करतील.

Lance Klusener | X/ICC

प्रशिक्षणाचा अनुभव

क्लुजनर यांना प्रशिक्षणाचा चांगला अनुभव आहे. त्यांनी अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या संघानाही मार्गदर्शन दिले आहे. इतकेच नाही, तर दिल्ली आणि त्रिपूरा या भारताच्या राज्य संघांचेही ते मार्गदर्शक राहिले आहेत.

Lance Klusener | X/ProteasMenCSA

आयपीएलचा अनुभव

क्लुजनर यांनी आयपीएलमध्ये यापूर्वी मुंबई इंडियन्सचे सहाय्यर प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना आयपीएलचाही अनुभव आहे.

Lance Klusener | X/ProteasMenCSA

डर्बन सुपर जायंट्सचे प्रमुख प्रशिक्षक

तसेच क्लुजनर SA20 मध्ये डर्बन सुपर जायंट्सचेही प्रमुख प्रशिक्षक आहेत.

Lance Klusener | X/DurbansSG

Pro Kabaddi: पुणेरी पलटण नवा चॅम्पियन! पाहा सर्व विजेत्यांची यादी

Pro Kabaddi Winner | Puneri Paltan | X/ProKabaddi