Sameer Amunekar
अनेक मुली शिक्षण व करिअरकडे लक्ष देत असतात. त्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत असतात आणि लग्नाने त्यांच्या स्वप्नांवर मर्यादा येतील अशी भीती वाटते.
लग्नानंतर व्यक्तिगत स्वातंत्र्य कमी होईल, निर्णय घेण्यावर बंधन येईल असं वाटतं. त्यामुळे काही मुली लग्न टाळतात.
साथीदार चुकीचा ठरला, तर संपूर्ण आयुष्य प्रभावित होऊ शकतं. या भीतीने मुली लग्नाच्या निर्णयाकडे सावधपणे पाहतात.
लग्नानंतर घरकाम, सासरचं जबाबदारी, मुलं-बाळं या गोष्टींपासून पळ काढत नाहीत, पण काहींना ते खूप लवकर किंवा एकट्यावर येईल असं वाटतं.
काही मुलींना बालपणी घरातील तणावग्रस्त नातेसंबंध, घटस्फोट, किंवा वैवाहिक हिंसाचार पाहावा लागलेला असतो. त्यामुळे लग्नाची भीती वाटते.
शिक्षण, विचारसरणी, दृष्टिकोन यामध्ये जुळणारा जोडीदार मिळत नाही, म्हणूनही लग्न पुढे ढकललं जातं.
"मुलगी म्हणून असं वाग, तसं बोल" या समाजाच्या अटींनी वैवाहिक जीवनाचं स्वप्न धुसर होतं. त्यामुळे काही मुली स्वतःच्या अटींवर जगणं पसंत करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.