Sameer Amunekar
विषारी सापांच्या चावण्यात दोन लांब बारीक दातांचे खोल ठसे दिसतात. बिनविषारी साप चावल्यास फक्त रेषांसारखे किंवा छोट्या दातांचे अनेक ठसे असतात.
विषारी साप चावल्यास चावलेली जागा लगेच सुजते, लालसर होते किंवा जळजळ होते. बिनविषारी सापाच्या चाव्याने अशा तीव्र प्रतिक्रिया सहसा दिसत नाहीत.
विषारी साप चावल्यास तीव्र वेदना आणि जळजळ जाणवते. बिनविषारी साप चावल्यास वेदना सौम्य किंवा नाममात्र असतात.
विषारी सापाच्या विषामुळे त्वचेवर रक्तस्त्राव, काळसर किंवा निळसर डाग दिसतात. बिनविषारी साप चावल्यास असे बदल सहसा होत नाहीत.
विषारी साप चावल्यास उलटी, चक्कर, श्वास घेण्यात त्रास, घाम येणे, अशक्तपणा जाणवतो. बिनविषारी साप चावल्यास ही लक्षणं सहसा नसतात.
साप चावल्यावर जर रुग्णाची लाळ जास्त सुटत असेल किंवा तो गुंगट वाटत असेल, तर तो विषारी साप असू शकतो.
साप अजूनही जवळ असेल तर त्याचा रंग, डोके तिकोनी आहे का, डोळ्यांच्या बुबळीची आकृती (गोल की लांबट) पाहून तज्ज्ञ साप विषारी आहे की नाही याचा अंदाज लावू शकतात.