Manish Jadhav
या किनाऱ्याच्या आसपासच्या जंगलात मोठ्या संख्येने रंगीबेरंगी फुलपाखरे आढळतात. विशिष्ट ऋतूंमध्ये येथे हजारो फुलपाखरांचा वावर असतो, म्हणूनच याला 'बटरफ्लाय बीच' असे नाव पडले आहे.
हे समुद्रकिनारा मुख्य गर्दीपासून दूर आणि टेकड्यांनी वेढलेले आहे. त्यामुळे ज्यांना शांतता आणि एकांत हवा आहे, अशा पर्यकांसाठी हे दक्षिण गोव्यातील सर्वोत्तम ठिकाण मानले जाते.
या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी थेट रस्ता नाही. पर्यटक पाळोळे किंवा अगोंद समुद्रकिनाऱ्यावरुन बोटीने येथे येऊ शकतात. धाडसी लोकांसाठी जंगलातून जाणारा एक निसर्गरम्य ट्रेकचा पर्यायही उपलब्ध आहे.
येथील किनारा सोनेरी वाळूने व्यापलेला असून अरबी समुद्राचे विहंगम आणि स्वच्छ निळे पाणी पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते.
बटरफ्लाय समुद्रकिनाऱ्याच्या पाण्यात अनेकदा डॉल्फिन दिसतात. बोटीने प्रवास करताना किंवा किनाऱ्यावरुन शांतपणे निरीक्षण केल्यास हे विलोभनीय दृश्य पाहायला मिळू शकते.
सभोवतालच्या हिरव्यागार टेकड्या, अथांग समुद्र आणि मावळत्या सूर्याचे दृश्य यामुळे हे ठिकाण फोटोग्राफर्स आणि कपलसाठी 'फोटोशूट'चे एक हॉटस्पॉट बनले आहे.
इतर प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत येथे वर्दळ कमी असल्याने निसर्गाचे मूळ रुप अजूनही टिकून आहे. येथे कोणतीही मोठी हॉटेल्स किंवा गोंगाट नसल्याने निसर्गाशी संवाद साधता येतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.