Sameer Amunekar
भारतात हनिमूनसाठी अनेक सुंदर आणि रोमँटिक ठिकाणे आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पर्वत, समुद्रकिनारे किंवा सांस्कृतिक ठिकाणे निवडू शकता.
हिमाचल प्रदेश मधील मनाली हनिमूनसाठी एक अद्भुत ठिकाण आहे. येथे बर्फाच्छादित पर्वत आणि थंड हवामानामुळे येथे रोमँटिक वातावरण असते. येथे हिरव्यागार दऱ्या आणि निसर्ग सौंदर्य अनुभवता येते.
राजस्थानमधील उदयपूर हे भारतातील सर्वात रोमँटिक शहरांपैकी एक मानले जाते. राजेशाही वातावरण, सुंदर तलाव आणि भव्य राजवाडे यामुळे हे हनिमूनसाठी आदर्श ठिकाण आहे.
अल्लेप्पी (अलप्पुझा) हे केरळच्या बॅकवॉटर्ससाठी प्रसिद्ध असून, हनिमूनसाठी एक अत्यंत रोमँटिक आणि शांत ठिकाण आहे. निसर्गरम्य नद्या, हिरवाईने भरलेली नारळाची झाडे आणि शांत समुद्रकिनारे हे येथे भेट देण्यासारखे ठिकाणे आहेत.
गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय हनिमून डेस्टिनेशन आहे. सुंदर समुद्रकिनारे, रोमँटिक सनसेट, भरभराटीचं नाइटलाइफ आणि साहसी वॉटर स्पोर्ट्स यामुळे हे जोडप्यांसाठी एक बेस्ट ठिकाण आहे.
सिक्कीम हे हनिमूनसाठी एक सुंदर, शांत आणि स्वच्छ ठिकाण आहे. बर्फाच्छादित पर्वत, हिरवीगार दऱ्या आणि बौद्ध संस्कृती यामुळे हे जोडप्यांसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. थंड हवामान आणि निसर्गरम्य वातावरण तुमच्या हनिमूनला अजूनच खास बनवते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.