Sameer Amunekar
'स्टाईल' सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता साहिल खानने दुसरं लग्न केलं आहे.
दुबईतील बुर्ज खलिफा येथे २२ वर्षीय गर्लफ्रेंड मिलेना अलेक्झांड्रासोबत साहिल खानने विवाह केला.
साहिल ४८ वर्षांचा असून, त्याच्या आणि मिलेनाच्या वयात २६ वर्षांचे अंतर आहे.
मिलेना बेलारूसची रहिवासी आहे. साहिलने आधी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केलं आणि नंतर इस्लामिक पद्धतीने निकाह केला.
"प्रेमाची परिभाषा वयानं ठरवता येत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना समजून घेणं आणि सोबत पुढे जाणं म्हणजेच प्रेम", असं साहिल म्हणाला आहे.
साहिल खानने स्वतः इंस्टाग्रामवर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
लग्नाच्या दिवशी, साहिलने क्लासिक ब्लॅक टक्सिडो घातला होता, ज्यामध्ये तो खूप स्टायलिश दिसत होता.
साहिलचं हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी, २००३ मध्ये त्याने इराणी वंशाच्या नॉर्वेजियन अभिनेत्री नेगर खानसोबत विवाह केला होता.
साहिल आणि नेगर यांचा २००५ मध्ये घटस्फोट झाला.