Bankot Fort: सावित्री नदीच्या मुखावर दिमाखात उभा असलेला शिवपूर्वकालीन 'बाणकोट' किल्ला

Sameer Amunekar

बाणकोट किल्ला

बाणकोट किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात, मंडणगड तालुक्यातील ठिकाणापासून ३५ किमी. अंतरावर, सावित्री नदीच्या मुखावर एका उंच भूशिरावर वसलेला आहे. हिम्मतगड किंवा फोर्ट व्हिक्टोरिया या नावानेही ओळखला जातो.

Bankot Fort | Dainik Gomantak

प्रवेशमार्ग

मंडणगड ते वेळास राज्य महामार्गावरून उमरोली व बाणकोट गावापर्यंत पोहोचता येते; तिथून छोट्या घाट रस्त्याने गडापर्यंत जायचा मार्ग आहे. घाट रस्ता दाट आमराईतून बाणकोट टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो.

Bankot Fort | Dainik Gomantak

गडाची संरचना

पठारावर गडाचा मागील तट, बुरूज व तटाखालील खंदक दिसतो. मुख्य दरवाजा उत्तरेला असून जमिनीकडून सहज प्रवेश न होण्यासाठी १० फूट खोल आणि १५ फूट रुंद खंदक खोदलेला आहे.

Bankot Fort | Dainik Gomantak

खंदकाचे वैशिष्ट्य

जांभा दगडात खोदलेला हा खंदक फक्त आग्नेयेकडील भागात आहे आणि सध्या अर्धवट बुजलेला आहे; कोकणातील जयगड, देवगड, यशवंतगड इत्यादी किल्ल्यांसारखा.

Bankot Fort | Dainik Gomantak

प्रवेश मार्ग

खंदक व तटबंदी डावीकडे ठेवून उजवीकडे वळसा घालून मुख्य दरवाजाजवळ पोहोचता येते; दरवाजाजवळून समुद्राचे सुंदर दर्शन होते.

Bankot Fort | Dainik Gomantak

दरवाजा व बुरुज

गडाचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असून दोन बुरुजांमध्ये बांधलेला आहे आणि अद्याप पूर्ण स्थितीत टिकलेला आहे.

Bankot Fort | Dainik Gomantak

पायऱ्या व पडकोट

दरवाजापासून पायऱ्या समुद्रापर्यंत उतरतात, ज्या बुजलेल्या अवस्थेत दिसतात; पायऱ्या संपल्यावर पडकोटात बुरुज व तटबंदीचे अवशेष दिसतात.

Bankot Fort | Dainik Gomantak

मुलींनो, हेअर कलर करताय? 'या' टिप्स फॉलो करा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hair Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा