Sameer Amunekar
हेअर कलर करण्याआधी केसांवर नियमित तेल मसाज आणि प्रोटीन ट्रीटमेंट करा, जेणेकरून केस रंगामुळे लगेच खराब होणार नाहीत.
सल्फेट किंवा पॅराबेन नसलेला सौम्य शॅम्पू वापरा. हे कलर टिकवायला आणि केसांची ओलावा राखायला मदत करेल.
कलरनंतर केस कोरडे होतात. त्यामुळे प्रत्येक धुवाईनंतर डीप कंडिशनर लावा.
वारंवार कलर बदलू नका. सतत केमिकल वापरल्याने केसांची ताकद कमी होते आणि ते तुटतात.
स्ट्रेटनर, कर्लर किंवा ड्रायरचा जास्त वापर टाळा. गरज असेल तर हीट प्रोटेक्शन सीरम नक्की लावा.
बाहेर जाताना केस झाकून ठेवा किंवा हेअर सिरम वापरा. यामुळे रंग लवकर फिका होत नाही.
केसांचे आरोग्य आतूनही मजबूत असते. प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि पाणी पुरेसे घेतल्याने कलर केलेले केसही मऊ आणि चमकदार राहतात.