Aurangzeb: सत्ता, हताशा आणि मृत्यू: औरंगजेबाचा कसा झाला अंत?

Sameer Amunekar

औरंगजेब

1681 मध्ये औरंगजेब दक्षिण मोहिमेसाठी प्रचंड सैन्यासह उतरला. औरंगजेबाने शेवटची तीन दशके दख्खनमध्येच काढली, असं इतिहासकार सांगतात.

Aurangzeb | Dainik Gomantak

सत्तेसाठी धडपड

दख्खन जिंकण्यासाठी औरंगजेब स्वतः नेतृत्व करीत होता.भीमसेन सक्सेनाच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की औरंगजेब किल्ल्यांसाठी अतोनात लोभ दाखवत होता. भारतभर साम्राज्य विस्तारण्याची त्याची महत्त्वाकांक्षा अपयशी ठरली.

Aurangzeb | Dainik Gomantak

मानसिक थकवा

औरंगजेबने दक्षिण भारतातील मुस्लिम राजे आणि मराठ्यांविरुद्ध दीर्घकालीन मोहिमा सुरू केल्या. विजापूर, गोलकुंडा यांसारख्या सत्तांना नामशेष केल्यानंतर त्याचे मुख्य लक्ष्य होते – मराठे. पण या युद्धांनी त्याला आर्थिक व मानसिक थकवा दिला.

Aurangzeb | Dainik Gomantak

मराठ्यांची रणनीती

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठे लढत राहिले. छापामार युद्धशैलीमुळे औरंगजेबाला एकही निर्णायक विजय मिळवता आला नाही. मराठ्यांनी त्याचे सैन्य सतत थकवत ठेवले.

Aurangzeb | Dainik Gomantak

छत्रपती संभाजीनगर

औरंगजेब १६८१ मध्ये औरंगाबाद (सध्याचं छत्रपती संभाजीनगर) शहरात आल्याचं सांगितलं जातं. या भागातच तो शेवटपर्यंत अडकून राहिला. युद्ध, मोहिमा आणि निर्णयांमध्ये तो अडकत गेला.

Aurangzeb | Dainik Gomantak

मानसिक हताशा

सततच्या लढायांमुळे आणि अपेक्षित विजय मिळत नसल्यामुळे औरंगजेब मानसिकदृष्ट्या खचला होता.

Aurangzeb | Dainik Gomantak

औरंगजेबाचा मृत्यू

औरंगजेबाचा मृत्यू ३ मार्च १७०७ रोजी औरंगाबाद (सध्याचं छत्रपती संभाजीनगर) येथे झाला. मुघल साम्राज्याचा सर्वात दीर्घकाळ सत्तेत असलेला सम्राट शेवटी मराठ्यांच्या भूमीतच मरण पावला.

Aurangzeb | Dainik Gomantak

'नारळी पौर्णिमे'ची 7 रहस्ये जाणून घ्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narali Purnima | Dainik Gomantak
येथे क्लिक करा