Sameer Amunekar
नारळी पौर्णिमेला समुद्रदेवतेची पूजा करून कोळी समाज नारळ अर्पण करतो. हे समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं प्रतीक आहे.
या दिवशी पावसाळ्यानंतर मासेमारीचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे हा दिवस कोळी समाजासाठी आर्थिकदृष्ट्या महत्वाचा ठरतो.
नारळाला शुभ मानलं जातं. म्हणून समुद्राला नारळ अर्पण करून सुरक्षितता आणि संपन्नतेसाठी प्रार्थना केली जाते.
कोळी या दिवशी आपली मासेमारीची बोट स्वच्छ करतात, सजवतात आणि नवीन जाळ्यांचा वापर सुरू करतात.
नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने किनारी भागात खास नृत्य, लोकगीतं आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात.
समुद्रातून चांगला मासळीचा माल मिळावा आणि संपूर्ण हंगामात सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी नारळी पौर्णिमेला विशेष प्रार्थना केली जाते.
हा फक्त कोळी समाजाचा नाही तर किनारी भागात सर्वांनी आनंदाने साजरा होणारा सण आहे. एकत्रित जेवण, मेजवानी आणि जल्लोष हा याचा अविभाज्य भाग आहे.