गोमन्तक डिजिटल टीम
पोर्तुगीजांच्या काळात इथे काही पोर्तुगीज शासक राहायचे, आजही इथे उभ्या रंगेबिरंगी घरांसोबत फोटोज घेता येतात.
समुद्राची आवड असेल तर भेट द्यावी असं ठिकाण. दक्षिण गोव्यातील अगोंडा आणि पाळोळेममधील ही समुद्रकिनारपट्टी. बोटीतून प्रवास करत या बेटाला भेट देता येते.
मराठे, पोर्तुगीज, मुस्लिम यांचे आक्रमण या किल्ल्यावर झाले . हा किल्ला जेवढा प्रेक्षणीय, तेवढाच ऐतिहासिक दृष्टया महत्वाचा आहे.
गोव्यातील अनेक सुंदर बेटांपैकी एक बेट म्हणजे दीवर. इथे विविध चर्चिसनी व्यापलेली रमणीय जागा अनुभवायला मिळते.
हार्टच्या आकाराचा हा तलाव अनेकांना आकर्षित करतो, खास करून पावसाळ्याच्या दिवसात इथे निसर्गाची सुंदरता अनुभवता येते. खडक आणि निळा समुद्र यांचे एकत्रीकरण म्हणजे हार्ट लेक.
शांत समुद्र अनुभवायचा असेल तर सिक्केरी बीचला नक्कीच भेट द्या. इथे सूर्यास्ताचा फार सुंदर अनुभव घेता येतो.
व्हागतोर समुद्राच्या जवळच हिलटॉप आहे. थंडगार हवा, भलामोठा समुद्र आणि शांतात जर का सोबत अनुभवायची असेल तर इथे भेट द्यावी.