Manish Jadhav
उन्हाळ्यात बाहेरच्या उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते. सोलकढीमधील कोकम आणि नारळाचे दूध शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यास मदत करते.
सोलकढीमध्ये वापरले जाणारे जिरे आणि कोकम पचनशक्ती वाढवतात. जड जेवणानंतर सोलकढी प्यायल्याने अन्नाचे पचन नीट होते आणि गॅसचा त्रास कमी होतो.
उन्हाळ्यात अनेकदा छातीत जळजळ किंवा पित्ताचा त्रास होतो. सोलकढी पित्तशामक असल्याने ती प्यायल्याने ॲसिडिटीपासून त्वरित आराम मिळतो.
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते. सोलकढी एक उत्तम 'हायड्रेटिंग ड्रिंक' आहे, जे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करते.
सोलकढीमध्ये वापरण्यात येणारे नारळाचे दूध आणि मसाल्यांमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
सोलकढीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते आणि ती प्यायल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते. यामुळे अवांतर खाणे टाळले जाते आणि वजन घटवण्यास मदत होते.
कोकममधील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला तजेला देतात. उन्हाळ्यामुळे येणारी खाज किंवा पुरळ कमी करण्यासाठी सोलकढीचे सेवन उत्तम ठरते.
सोलकढीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे उन्हाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून शरीराचे रक्षण होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.