Winter Health Tips: हिवाळ्यातील 'सुपरफूड'! थंडीत ऊब आणि शक्ती देणारा 'हा' पदार्थ कोणता? लगेच जाणून घ्या

Manish Jadhav

रोगप्रतिकारशक्ती वाढवा

लसणामध्ये 'अॅलिसिन' (Allicin) नावाचे संयुग असते, जे नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून काम करते आणि हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि फ्लूशी लढण्यास मदत करते.

Garlic | Dainik Gomantak

शरीर ठेवा उबदार

लसणाचा गुणधर्म गरम असतो. हिवाळ्यात रोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते आणि थंडीचा त्रास कमी होतो.

Garlic

हृदयविकारांपासून संरक्षण

हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. लसूण रक्त पातळ ठेवण्यास आणि रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Garlic | Dainik Gomantak

पचनक्रिया सुधारणा

थंड हवामानामुळे पचनक्रिया मंदावते. लसूण पाचक रसांना उत्तेजित करते आणि पचनक्रिया (Digestion) सुधारण्यास मदत करते.

Garlic | Dainik Gomantak

विषारी घटक

लसणामध्ये असलेले सल्फरयुक्त घटक शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे यकृत (Liver) निरोगी राहते.

Garlic | Dainik Gomantak

सांधेदुखीवर आराम

हिवाळ्यात सांधेदुखी वाढते. लसणामध्ये दाहक-विरोधी (Anti-inflammatory) गुणधर्म असल्याने ते सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करते.

Garlic | Dainik Gomantak

नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट

लसूण एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे, जे पेशींना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते आणि त्वचेला हिवाळ्यातही तजेलदार ठेवते.

Garlic | Dainik Gomantak

Kia Carens CNG: किआ कॅरेन्सचा नवा सीएनजी 'अवतार'! तुमच्या फॅमिलीसाठी परफेक्ट कार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखी बघा