Manish Jadhav
प्रसिद्ध तबलावादक पंडित झाकीर हुसेन यांचं हृदयाशी संबंधित आजारामुळे सॅन फ्रॅन्सिस्को येथे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालं.
वडिलांकडूनच तबल्याचं बाळकडू मिळालेल्या झाकीर यांनी वयाच्या बाराव्या वर्षीच कारकिर्दीला सुरुवात केली होती.
झाकीर यांच्या व्यावसायिक कारकिर्दीविषयी अनेकांना माहिती असली तरी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.
झाकीर हुसेन यांनी त्यांच्या कुटुंबीयांना न सांगता गुपचूप लग्न उरकलं होतं. त्याविषयी त्यांनी एका मुलाखतीत सविस्तर सांगितलं होतं.
झाकीर यांच्या आईचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. परंतु नंतर त्यांनी अँटोनियाला सुनेच्या रुपात स्वीकारलं.
झाकीर हुसेन यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात कॅलिफोर्नियातून झाली. ते एका इटालियन-अमेरिकन मुलीच्या प्रेमात पडले होते. अँटोनिया मिनेकोला असं तिचं नाव होतं.
झाकीर आणि अँटोनिया यांनी आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं होतं.