Manish Jadhav
डिसेंबर महिन्यात गोव्याचा प्लॅन बनवत असाल इथल्या मोहिनी घालणाऱ्या नाईट लाईफचा नक्की आनंद घ्या.
गोव्याची नाईट लाईफ पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असते. पार्ट्या, बीच शॅक इत्यादी गोव्याच्या प्रसिद्ध पैलूंनी गोव्यातील त्यांचे दिवस साजरे होत असतात.
काही वर्षांपूर्वी गोव्यातील नाईट लाईफला फारसं ग्लॅमर नव्हतं, परंतु बदलत्या काळाच्या ओघात गोव्यात अमूलाग्र बदल झाला. देश-विदेशातील पर्यटकांनी गोवा फुलून गेला.
स्थानिकांसाठी संध्यासमयीची ही अर्थव्यवस्था मनोरंजनाची नव्हे तर आपल्या कुटुंबाला टिकून ठेवणारी एक महत्त्वाची स्त्रोत बनली आहे.
गोव्याच्या नाईट लाईफमध्ये गेल्या वर्षात झालेल्या लक्षणीय बदलांपैकी एक म्हणजे लहान सहान तावेर्न आणि समुद्र किनाऱ्यावरील शॅक भव्य नाईट क्लब आणि लाउंजमध्ये बदलून गेली आहेत.
मात्र झपाट्याने व्यावसायिकरण होत असूनही गोव्याच्या किनाऱ्यावरील अनेक क्लब आणि शॅक अजूनही गोमंतकीयांच्या मालकीचे आहेत आणि त्यातून रोजगारांची निर्मितीही होत आहे.