Pranali Kodre
भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी आणि डान्सर धनश्री वर्मा हे चर्चेत असणारं सेलिब्रेटी जोडपं आहे.
युजवेंद्र आणि धनश्री यांनी 22 डिसेंबर 2020 रोजी लग्नगाठ बांधली होती.
आता त्यांच्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त युजवेंद्रने धनश्रीला खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
युजवेंद्र शेअर केलेल्या पोस्ट मध्ये त्याचे आणि धनश्रीचे अनेक रोमँटिक फोटो आहेत.
तसेच त्याने तिच्यासाठी खास कॅप्शनही टाकले आहे. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये पत्नीसाठी रोमँटिक नोट लिहिली आहे.
त्याने लिहिले, 'प्रिय पत्नी, आपल्या पहिल्या भेटीपासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत, या प्रवासातील प्रत्येक सेकंद माझ्या हृदयाच्या जवळ आहे. ते म्हणतात जोड्या स्वर्गात बनतात आणि मला खात्री आहे ज्याने कोणी आपली स्क्रिप्ट लिहली असेल, ती माझ्या बाजूने लिहिली असेल. तू प्रत्येक दिवशी मला चांगला व्यक्ती बनवतेस. तू मला पूर्ण करतेस. माझं प्रेम, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
धनश्री आणि चहल यांच्या पोस्टवर सध्या चाहत्यांकडूनही प्रेमाचा वर्षाव होत आहे.