Yuvraj Singh ने दोन नाही, तर जिंकलेत 'हे' तीन वर्ल्डकप

Pranali Kodre

मोठ्या स्पर्धांचा खेळाडू

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग मोठ्या स्पर्धांचा खेळाडू म्हणून ओळखला जातो.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

विक्रम

त्याच्या नावावर वरिष्ठ स्तरावर तब्बल 7 आयसीसी स्पर्धांंच्या अंतिम सामन्यात खेळण्याचा विश्वविक्रम आहे.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

अंतिम सामने

त्याने 2000, 2002 आणि 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे, 2007 आणि 2014 साली झालेल्या टी20 वर्ल्डकपचे, तसेच 2003 आणि 2011 वर्ल्डकपचे अंतिम सामने खेळले आहेत.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

सलग 6 षटकार

तो 2007 टी20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. याच स्पर्धेत त्याने इंग्लंडविरुद्ध 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रमही केला होता.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

मालिकावीर

युवराज 2011 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा प्रमुख सदस्य होता. त्याने या स्पर्धेत केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला मालिकावीर पुरस्कार मिळाला होता.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

19 वर्षांखालील वर्ल्डकप विजेता

याशिवाय युवराजने 2000 साली झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्येही भारतीय संघाकडून खेळला होता. हा वर्ल्डकपही भारताने जिंकला होता.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

तीनवेळचा वर्ल्डकप विजेता

त्यामुळे युवराजने 19 वर्षांखालील, टी20 आणि वनडे वर्ल्डकप विजेता खेळाडू आहे.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

रोहित शर्माच्या नावावर आजपर्यंत कोणालाच न जमलेला ऐतिहासिक विक्रम

Rohit Sharma
आणखी बघण्यासाठी