Sameer Panditrao
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात 3,895 मीटर उंचीवर वसलेलं युला कांडा हे एक पवित्र आणि नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध ठिकाण आहे.
युला कांडा येथे श्रीकृष्णाचं एक मंदिर आहे, जे जगातील सर्वात उंच ठिकाणी वसलेलं कृष्ण मंदिर मानलं जातं.
हे मंदिर जात, धर्म वा समुदाय भेद न ठेवता सर्व भक्तांसाठी खुले आहे.
स्थानिक मान्यतेनुसार, हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवास काळात बांधलं होतं. त्यामुळे याला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.
युला खास गावापासून सुरू होणारा सुमारे 12 किमी लांब ट्रेक घनदाट जंगलं, हिरवी कुरणं आणि बर्फाच्छादित पर्वतांच्या सोबतीने अनुभवता येतो.
युला कांडा भेट देण्यासाठी मे महिन्याच्या मध्यापासून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंतचा काळ सर्वोत्तम असतो. हवामान अनुकूल आणि ट्रेक सुरक्षित!
प्रत्येक वर्षी जन्माष्टमी ला येथे खास कार्यक्रम होतो . किन्नौरसह आसपासच्या भागातील श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी होतात.