Manish Jadhav
रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माला अद्याप लय गवसली नाहीये. दुसऱ्या डावात रोहित अशा गोलंदाजाकडून आऊट झाला ज्याची कारकीर्द त्याच्या पाच बहिणींनी मिळून घडवली.
आज (22 जानेवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज युद्धवीर सिंहबद्दल जाणून घेणार आहोत.
युद्धवीरने केवळ रोहितलाच टिपले नाहीतर टीम इंडियाचा सध्याचा सर्वोत्तम फलंदाज यशस्वी जयस्वालचीही शिकार केली.
युद्धवीरचा जन्म 13 सप्टेंबर 1997 रोजी जम्मूतील रुप नगर येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे संपूर्ण नाव युद्धवीर सिंह चरक असे आहे.
युद्धवीरला त्याचे आई-वडील अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सातत्याने सांगायचे. मात्र त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा क्रिकेटवर जास्त असायचे.
युद्धवीरला क्रिकेटर व्हायचे होते पण त्याच्या पालकांनी त्याला कधीही पाठिंबा दिला नाही. पण त्याला त्याच्या पाच बहिणींनी पाठिंबा दिला. त्यांनी आपल्या भावाला क्रिकेटर बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
युद्धवीरची प्रोफेशनल क्रिकेट कारकीर्द12 नोव्हेंबर 2019 रोजी सुरु झाली. युधवीरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हैदराबादकडून पहिला सामना खेळला. त्याने पहिल्याच सामन्यात दोन विकेट्स घेतल्या होत्या.
युद्धवीरने 2021च्या आयपीएल हंगामातही आपल्या घातक गोलंदाजीचा जलवा दाखवून दिला.