Manish Jadhav
आयसीसीने महिला फलंदाजांची नवीन वनडे रँकिंग जाहीर केली आहे.
आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा भारताची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाला आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला.
आयसीसी रँकिंगच्या टॉप-10 मध्ये स्थान मिळवणारी स्मृती एकमेव भारतीय महिला फलंदाज बनली. स्मृती वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके करणारी खेळाडू आहे. स्मृतीचे सध्या 738 रेटिंग पॉंइट्स आहेत.
आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 135 धावांची तूफानी खेळी खेळून स्मृतीने संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती.
दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडलेली भारतीय महिला संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर रँकिंगमध्ये 15व्या स्थानावर आहे. तिचे 604 रेटिंग पॉंइट्स आहेत.
दीप्ती शर्मा 344 रेटिंग पॉंइट्ससह अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाची अॅशले गार्डनर दक्षिण आफ्रिकेची अनुभवी खेळाडू मॅरिझाने कॅपला मागे टाकत यादीत अव्वल स्थानावर पोहोचली आहे.