गोमन्तक डिजिटल टीम
डिसेंबरमध्ये गोव्याचं हवामान आल्हाददायक असतं. .समुद्रकिनाऱ्यावर Enjoy करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.
डिसेंबरमध्ये गोव्यात नाताळ व नवीन वर्ष स्वागतासाठीचे सण मोठ्या उत्साहाने साजरे होतात.
बागा, अंजुना, आणि कळंगुट यांसारख्या किनाऱ्यांवर विशेष डिसेंबर नाईट पार्टीज होतात. डीजे, लाईव्ह म्युझिक, आणि फायर शो हे तुमच्या आठवणी अविस्मरणीय बनवतील.
डिसेंबरमध्ये वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. पॅरासेलिंग, जेट स्कीइंग, आणि स्कूबा डायव्हिंग हे साहसी खेळ तुम्हाला थरारक अनुभव देतील.
गोव्याच्या धबधब्यांचा आणि वन्यजीव अभयारण्यांचा आनंद घ्या. दुधसागर धबधबा आणि सलिम अली पक्षी अभयारण्य हे विशेष आकर्षण आहेत.
गोव्याच्या जुन्या चर्चेस, वाडे, किल्ले, मंदिरे पाहण्यासाठी डिसेंबरची वेळ चांगली आहे. बेसिलिका ऑफ बॉम जीझस चर्च UNESCO वर्ल्ड हेरिटेज साइट आहे
सोबताला रोमँटिक सूर्यास्त, खरेदीसाठी मार्केट, स्थानिक खाद्यपदार्थांची रेलचेल आहेच.