Sameer Amunekar
योग करण्यापूर्वी आंघोळ केल्याने शरीरातील घाम, धूळ आणि विषारी घटक दूर होतात. त्यामुळे शरीर स्वच्छ राहते आणि ताजेतवानेपणा येतो.
थंड किंवा कोमट पाण्याने स्नान केल्याने शरीरातील ऊर्जा प्रवाह (प्राणशक्ती) सक्रिय होतो, ज्यामुळे योगासन करताना एकाग्रता आणि स्थैर्य वाढते.
पाण्याचा स्पर्श मनाला शांत करतो. स्नानानंतर मनातील ताण आणि चिंता कमी होतात, त्यामुळे ध्यान आणि प्राणायाम अधिक प्रभावी ठरतात.
जर तुम्ही सकाळी उठून थेट योग सुरू केला तर शरीरावरचा रात्रीचा घाम अस्वस्थता निर्माण करू शकतो. आंघोळ केल्याने ही समस्या टळते.
आयुर्वेद आणि योगशास्त्रानुसार, आंघोळ ही ‘शौच’ म्हणजेच शुद्धी प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. स्वच्छ शरीरातच सकारात्मक ऊर्जा वास करते.
कोमट पाण्याने स्नान केल्याने स्नायू सैल होतात आणि रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे योगासन करताना शरीर अधिक लवचिक आणि तयार राहते.
तज्ज्ञांच्या मते, सकाळी योगापूर्वी हलक्या कोमट पाण्याने स्नान करणे सर्वोत्तम असते. मात्र थंड हवामानात शरीर गरम झाल्यावरच आंघोळ करावी.