Sameer Amunekar
योगासने सुरू करण्यापूर्वी १०-१५ मिनिटे हलका वॉर्म-अप नक्की करा. यामुळे शरीराचे स्नायू मोकळे होतात आणि दुखापतीचा धोका टळतो.
योगासने नेहमी सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर किमान ३ ते ४ तासांच्या अंतराने करावीत. भरल्या पोटी योगा केल्यास त्रास होऊ शकतो.
योगा करताना नेहमी सुती, सैल आणि आरामदायी कपडे घालावेत. यामुळे आसने करताना शरीराची हालचाल सहज आणि विनाअडथळा करता येते.
योगासने करताना श्वासोच्छवासाची योग्य गती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक आसनानुसार योग्य वेळी श्वास घेण्याची आणि सोडण्याची पद्धत पाळा.
सुरुवातीलाच कठीण आसने करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या शरीराला जेवढे झेपेल तेवढाच ताण द्या, क्षमतेपेक्षा जास्त ताण दिल्यास दुखापत होऊ शकते.
योगा नेहमी सपाट जमिनीवर योगा मॅट किंवा सतरंजी अंथरूनच करा. थेट फरशीवर किंवा मऊ गादीवर योगासने करणे टाळा.
जर तुम्हाला कोणताही आजार, मानदुखी, पाठदुखी किंवा दुखापत असेल, तर डॉक्टरांच्या किंवा प्रमाणित योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय योगासने करू नका.