गोमन्तक डिजिटल टीम
शारीरिक व्यायामासह मानसिक आरोग्य राखण्याचीही गरज आहे. मानसिक त्रास असेल तर वजन वाढते. त्यामुळे योगाचाही आधार जान्हवी घेताना दिसत आहे. नियमित योगा करून फिटनेस राखण्याचा प्रयत्न जान्हवी करते.
योग हा व्यायामाचा एक प्रकार आहे जो आपल्याला केवळ निरोगी आणि अधिक लवचिक ठेवतो त्याच बरोबर एखाद्या व्यक्तीला तणावमुक्त करण्यास आणि जीवनात अधिक सकारात्मक ठेवण्यात मदत करते करतो. करिश्मा तन्ना बंगेरा हि देखील व्यायाम करताना ही दिसत आहे.
सारा अली खान हिने देखील योगा करतानाचा फोटो शेअर केला आहे. सारा फिटनेससाठी नियमित योगासन करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. योगा हा फिटनेसचा एक कल्पक मार्ग आहे, असे ती मानते.
मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर बागेत योग आसनांचा सराव करताना अनेक फोटो शेअर केली आहेत. तिने त्यांना कॅप्शन दिले, "कृतज्ञ मनाने पुन्हा सुरुवात केली
जॅकलिन फर्नांडिस ही तिच्या फिटनेसाठी ओळखली जाते. जॅकलीनने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिचे वजन थोडेही वाढले तर तिला झोप येत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकलीन तिच्या डाएट प्लॅन, वर्कआउट रेजिम आणि योगा एक्सरसाइजने स्वतःला स्लिम फिट ठेवते. कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी आणि भाज्या जे ती योग्य प्रमाणात खाते.
रकुल प्रीत अनेकदा सोशल मीडियावर तिच्या फिटनेस रूटीनची झलक दाखवते. रकुल अनेक कठीण योगासने करण्यात पारंगत असली तरी तिला एरियल योगा खूप आवडतो. ती या फोटोत मेडीटेशन करताना दिसुन येत आहे.
मृणाल ठाकूर ही योगासन करताना दिसत आहे. मृणालने एका मुलाखतीत सांगितले होते की, फिट राहण्याची प्रेरणा मला अभिनेता हृतिक रोशनकडूनच मिळाली. आपली फिगर स्लिम राखण्यासाठी मृणाल योगा आणि नृत्य देखील करते. तसेच फिटनेस रूटीनमध्ये ती भरपूर वॉक देखील करते.
आलियाने नुकताच तिचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती एरियल योग करताना दिसतेय. ती एका दोरीच्या साहाय्याने योग करताना दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.