गोमन्तक डिजिटल टीम
हिवाळा जेव्हा गोव्याच्या लँडस्केपमध्ये हळूवार उतरतो तेव्हा तिथले गवत आणि झाडे पिवळ्या छटांसह लहरणार्या सोनेरी लाटांमध्ये बदलतात.
गोव्यात सणासुदीचा हंगाम पिवळा आणि आनंदाची उधळण घेऊन येतो. झेंडूची फुले घरे आणि मंदिरांना सुशोभित करतात.
नाजूक पिवळ्या पाकळ्या असलेले वन्य भेंडीचे फूल हे गोव्याच्या हिवाळ्यातील निसर्गरम्य रत्न आहे. हे फूल खाण्यायोग्य असते आणि रंगीत चहा बनवण्यासाठी वापरता येते.
या दिवसात शेवंतीदेखील गोव्याच्या बाजारपेठांना पिवळी जर्द बनवतात. सणांच्या वेळी स्त्रियाच्या केसांमध्ये हा पिवळा रंग फुलतो.
मेक्सिकन सूर्यफूल बागेत मोहिनी घालत असते. हिवाळ्यात ही चमकदार फुले उमलतात आणि सौंदर्य वाढवतात.
रस्त्यावर आणि दगड-कपारींमध्येही या दिवसात पिवळ्या फुलांचा सडा असा पसरलेला दिसतो ज्यातून आपोआपच सुंदर देखावा निर्माण होतो.
कॅन्डल कॅशिया आकर्षक मेणबत्तीच्या रूपाने फुलते आणि शेतात आणि रस्त्याच्या कडेचा लँडस्केप उजळून टाकते.