Sameer Panditrao
गोव्यापासूनच जवळच एक ऐतिहासिक किल्ला तुम्हाला पाहता येईल.
वाडीच्या सावंतांकडून छ. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून तो दुरुस्त केला होता.
या किल्ल्याचे नाव यशवंतगड अर्थात रेडीचा किल्ला.
या गडातील दरवाज्यांची रचना पाहण्यासारखी आहे.
किल्ल्याच्या काही भागाची पडझड झालेली आहे.
रेडीचे सुप्रसिद्ध गणेश मंदिर आणि किनारा इथून जवळ आहे.
हा किल्ला वेंगुर्ल्यापासून ३० तर पणजीपासून ५५ किमी अंतरावर आहे.