Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा सामना 7 ते 9 मार्चदरम्यान धरमशाला येथे पार पडला. या सामन्यात भारताने तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला.
धरमशाला येथे मिळवलेल्या विजयासह भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिकाही 4-1 अशा फरकाने जिंकली.
ही मालिका संपल्यानंतर मालिकावीर पुरस्कारही देण्यात आला. हा पुरस्कार भारताच्या यशस्वी जयस्वालने पटकावला.
यशस्वी जयस्वालने या संपूर्ण मालिकेत शानदार कामिगिरी नोंदवली. त्याने या मालिकेत 700 पेक्षाही जास्त धावा केल्या.
त्याने या मालिकेतील पाचही सामन्यात खेळताना 9 डावात 2 द्विशतके आणि 3 अर्धशतके केली. त्याने 9 डावात 79.91 च्या सरासरीने 712 धावा केल्या.
त्यामुळे जयस्वाल इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला. त्याने विराट कोहलीने 2016-17 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या 655 धावांच्या विक्रमाला मागे टाकले.
जयस्वालने या मालिकेत तब्बल 68 चौकार आणि 26 षटकारही मारले. तो एका कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडूही ठरला आहे.