Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा सामना 7 ते 9 मार्चदरम्यान धरमशाला येथे पार पडला. या सामन्यात भारताने तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला.
इंग्लंडला पराभव स्विकारावा लागला असला तरी 41 वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसाठी वैयक्तिकदृष्ट्या अविस्मरणीय ठरला.
या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात अँडरसनने शुभमन गिलनंतर कुलदीप यादवला बाद केले आणि कारकिर्दीतील 700 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या.
अँडरसन कसोटीमध्ये 700 विकेट्स घेणारा जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज आहे, तर एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे.
अँडरसनच्या आधी असा विक्रम कसोटी मुथय्या मुरलीधरन (800) आणि शेन वॉर्न (708) यांनी केला आहे, पण हे दोन्ही गोलंदाज फिरकीपटू आहेत.
अँडरसनने इंग्लंडकडून 2003 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. विशेष म्हणजे 2003 पासून प्रत्येक वर्षी अँडरसनने कसोटीत किमान एकतरी विकेट घेतली आहे.
त्यामुळे गेली सलग 22 वर्षे कसोटीत विकेट्स घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.