Manish Jadhav
आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शनिवारी (18 मे) सामना खेळला गेला. या रोमांचकारी सामन्यात पंजाब किंग्जने बाजी मारत राजस्थानला 10 धावांनी पराभवाची धूळ चारली. पण या सामन्यात यशस्वी जयस्वालने शानदार कामगिरी केली.
पंजाबने दिलेल्या लक्ष्याचा पाठलात करताना जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने राजस्थानला शानदार सुरुवात करुन दिली. जयस्वालने 24 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह त्याने यशस्वी कामगिरी केली.
जयस्वालने शानदार खेळीबरोबर एक नवा विक्रमही आपल्या नावावर केला. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा डावाच्या पहिल्या षटकात 20+ धावा करणारा खेळाडू बनला.
याशिवाय, डावाच्या पहिल्या षटकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रमही त्याने केला. 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या डावाच्या पहिल्या षटकात जयस्वालने 26 धावा केल्या होत्या. 2021 मध्ये पृथ्वी शॉने केकेआरविरुद्धच्या पहिल्या षटकात 24 धावा केल्या होत्या. तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जयस्वालने पंजाबविरुद्ध 25 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 50 धावा केल्या. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि एक षटकार मारला.
या धमाकेदार खेळीच्या जोरावर त्याने चालू हंगामात 500 धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएल 2005 मध्ये असा पराक्रम करणारा तो सहावा फलंदाज ठरला. त्याच्या आधी सूर्यकुमार यादव, साई सुदर्शन, विराट कोहली, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली.
तो आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. त्याने ऑरेंज कॅप मिळवली. यापूर्वी, ऑरेंज कॅप सूर्यकुमार यादवकडे होती, ज्याने 12 सामन्यांमध्ये 63.75 च्या सरासरीने 170 च्या स्ट्राईक रेटने 510 धावा केल्या आहेत.