Manish Jadhav
वेस्ट इंडीजविरुद्ध दिल्लीत खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात सलामीवीर यशस्वी जयस्वालने पुन्हा एकदा आपल्या बॅटची कमाल दाखवत दमदार शतक झळकावले.
जयस्वालने केवळ 224 चेंडूंमध्ये 150 धावांचा टप्पा पूर्ण केला. या खेळीत त्याने 19 चौकार मारले, मात्र एकही षटकार मारला नाही, ज्यामुळे त्याचा संयम स्पष्ट झाला.
कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी 150 हून अधिक धावा करण्याची ही जयस्वालची दुसरी वेळ आहे. असा पराक्रम करणारा तो विराट कोहलीनंतरचा फक्त दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
विराट कोहलीने (2016) आणि यशस्वी जयस्वालने (2024) विशाखापट्टणम येथे आणि त्यानंतर दिल्ली येथे दीडशतकी खेळी साकारली, हा एक खास योगायोग आहे.
यापूर्वी, 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी जायसवालने 179 धावांची मोठी खेळी खेळली होती.
सलामीचा जोडीदार केएल राहुल लवकर बाद झाल्यानंतर जायसवालला तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या साई सुदर्शन आणि त्यानंतर कर्णधार शुभमन गिल यांची चांगली साथ मिळाली.
विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता, तर जायसवाल सलामीवीर म्हणून ही कामगिरी करत आहे, ज्यामुळे त्याचे हे यश अधिक महत्त्वपूर्ण ठरते.
कसोटीच्या पहिल्या दिवशी दोनदा 150 पेक्षा अधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली.