Maruti Fronx: पेट्रोल, सीएनजीनंतर आता फ्लेक्स-फ्यूलची 'फ्रॉन्स', कधी होणार लॉन्च?

Manish Jadhav

जपानमध्ये ग्लोबल डेब्यू

मारुती फ्रॉन्स फ्लेक्स फ्यूल व्हेरियंट 29ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या जपान मोबिलिटी शो 2025 मध्ये जागतिक स्तरावर पहिल्यांदा सादर होणार आहे.

maruti fronx | Dainik Gomantak

खास डिझाईन

फ्लेक्स फ्यूल फ्रॉन्सचे डिझाईन मूळ मॉडेलसारखेच असले तरी, बोनट, दरवाजा आणि बाजूच्या भागावर लावलेले पिवळे ग्राफिक्स आणि स्टिकर्स याची खास ओळख दर्शवतील.

maruti fronx | Dainik Gomantak

फ्लेक्स फ्यूल इंजिन पर्याय

या मॉडेलमध्ये मारुती सुझुकीचे 1.2 लीटर किंवा 1.5 लीटर फ्लेक्स फ्यूल (Flex Fuel) इंजिन वापरले जाण्याची शक्यता आहे.

maruti fronx | Dainik Gomantak

लाँच

मारुती सुझुकीने घोषणा केली की, त्यांची पहिली फ्लेक्स फ्यूल कार (Frons or WagonR) मार्च 2026 पर्यंत भारतीय बाजारात दाखल होईल.

maruti fronx | Dainik Gomantak

स्ट्रॉंग हायब्रिड पॉवरट्रेनची योजना

फ्रॉन्स कॉम्पॅक्ट क्रॉसओवर लवकरच कंपनीने स्वतः विकसित केलेल्या स्ट्रॉंग हायब्रिड पॉवरट्रेनसह (Strong Hybrid Powertrain) लाँच करण्याचीही योजना आहे.

maruti fronx | Dainik Gomantak

विक्रमी मायलेजचा अंदाज

मारुतीच्या नवीन स्ट्रॉंग हायब्रिड सेटअपमधून 35 किमी/लीटरपेक्षा जास्त मायलेज मिळण्याची शक्यता आहे. यात 1.2 लीटर, 3-सिलेंडर Z-सिरीज इंजिनचा समावेश असू शकतो.

maruti fronx | Dainik Gomantak

ADAS तंत्रज्ञानाचे संकेत

अलीकडेच फ्रॉन्स हायब्रिडच्या टेस्ट मॉडेलमध्ये LiDAR सेन्सर (लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग) दिसला. ज्यामुळे यात ADAS (ऑटोनॉमस ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम) सुरक्षा फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

maruti fronx | Dainik Gomantak

स्पोर्टी लूक कायम

फ्लेक्स फ्यूल मॉडेलमध्येही पूर्वीप्रमाणेच स्पोर्टी बंपर, फॉक्स स्किड प्लेट्स, क्रोम डिटेल्स, १७-इंच मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स आणि स्प्लिट हेडलॅम्प डिझाईन कायम राहील.

maruti fronx | Dainik Gomantak

Health Tips: केळी खाल्ल्याने खरंच पोट साफ होतं का? जाणून घ्या

आणखी बघा