Yashasvi Jaiswal: आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा बदल; यशस्वी जैस्वालची धमाकेदार 'टॉप 5' मध्ये एन्ट्री!

Manish Jadhav

नवीन क्रमवारी जाहीर

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2-0 अशा कसोटी मालिका विजयानंतर आयसीसीने तातडीने फलंदाजांची नवीन क्रमवारी (Ranking) जाहीर केली.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

मोठी झेप

टीम इंडियाचा स्टार युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने ताज्या कसोटी क्रमवारीत दोन स्थानांची मोठी झेप घेतली.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

टॉप 5 मध्ये प्रवेश

जैस्वाल आता फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत थेट पाचव्या स्थानावर पोहोचला.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

रेटिंगमध्ये वाढ

जैस्वालची रेटिंग सध्या 791 इतकी झाली, जी त्याच्या उत्कृष्ट कामगिरीची साक्ष देते.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

शतकी खेळीचा फायदा

वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जैस्वालने शानदार शतक ठोकले, ज्यामुळे त्याच्या रेटिंगमध्ये वाढ झाली.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

बावुमा आणि मेंडिसला नुकसान

दुसरीकडे मात्र, जैस्वालच्या प्रगतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा आणि श्रीलंकेचा कामेंदु मेंडिस या दोघांनाही क्रमवारीत प्रत्येकी एका स्थानाचे नुकसान झाले.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

जैस्वालचा साथीदार

जैस्वालबरोबर भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत अजूनही आपल्या आठव्या स्थानावर कायम आहे.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

मर्सिडीजची सर्वात शक्तिशाली डिझेल G-Wagon लाँच; जाणून घ्या अफलातून फीचर्स

आणखी बघा