Manish Jadhav
मर्सिडीज बेंझ इंडियाने आपल्या G-Class रेंजमध्ये 'G 450d' नावाचा नवीन डिझेल व्हेरियंट लॉन्च केला.
G 450d ची किंमत 2.90 कोटी (एक्स-शोरुम) आहे. हे मॉडेल आधीपासून उपलब्ध असलेल्या पेट्रोल आणि इलेक्ट्रिक व्हेरियंट्सला एक नवीन डिझेल पर्याय म्हणून उपलब्ध झाले.
या SUV मध्ये 3.0-लीटर इनलाइन-सिक्स डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे 48V माईल्ड-हायब्रीड सिस्टीमसह येते. ही मर्सिडीज-बेंझची आतापर्यंतची भारतातील सर्वात शक्तिशाली डिझेल एसयूव्ही मानली जात आहे.
यात इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर (ISG) देण्यात आले आहे, जे कमी वेगावर इंजिनला 20 बीएचपीपर्यंतची इलेक्ट्रिक पॉवर देते, ज्यामुळे थ्रॉटल प्रतिसाद सुधारतो आणि इंधनाची बचत होते.
G 450d मध्ये G-Class ची ओळख असलेली लॅडर-फ्रेम चेसिस, तीन डिफरेंशियल लॉक आणि फ्रंटमध्ये इंडिपेंडेंट सस्पेंशनसह मागील बाजूस मजबूत ॲक्सल कायम ठेवण्यात आले आहे. ग्राउंड क्लीअरन्स 241 मिमी आणि पाण्यातून जाण्याची क्षमता 70 सेमी आहे.
उत्कृष्ट ऑफ-रोड क्षमता राखण्यासाठी यात ॲडाप्टिव्ह डॅम्पर स्टँडर्ड म्हणून देण्यात आले आहेत. एसयूव्ही 100 टक्के पर्यंतची चढण चढू शकते आणि 35° पर्यंतच्या बाजूच्या उतारावर स्थिर राहू शकते.
एरोडायनॅमिक्स सुधारण्यासाठी यात काही हलके बदल केले आहेत. नवीन फ्रंट बंपर पुन्हा डिझाइन केलेले A-पिलर क्लॅडिंग आणि रुफ एजवर स्पॉयलर लिप जोडली आहे.
SUV मध्ये 20-इंच हाय-ग्लॉस ब्लॅक AMG अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, पण या अपडेट्सनंतरही तिचा क्लासिक G-Class लूक कायम आहे.