Manish Jadhav
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु झाली आहे. पहिला सामना लीड्समध्ये खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताकडून सलामीवीरांच्या भूमिकेत आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारतासाठी इतिहास रचला. हेडिंग्लेमध्ये अशी कामगिरी करणारे हे दोन्ही खेळाडू पहिले भारतीय फलंदाज ठरले.
केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल जोडीने चमत्कार केला. हेडिंग्ले येथे भारतासाठी कसोटी फॉरमॅटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावांची भागीदारी करणारी जोडी ठरली. दोघांमध्ये 91 धावांची पाटर्नशिप झाली.
यापूर्वी, या मैदानावर कोणतीही सलामी जोडी इतकी मोठी भागीदारी करु शकली नव्हती. परंतु राहुल आणि जयस्वाल यांच्या जोडीने पहिल्याच सामन्यात हा चमत्कार केला.
भारताला चांगली सुरुवात दिल्यानंतर केएल राहुल पॅव्हेलियनमध्ये परतला. तो 78 चेंडूत 42 धावा करुन आऊट झाला. त्याने आपल्या खेळीदरम्यान 8 चौकार लगावले.
मात्र, ब्रायडन कार्सेने राहुल आणि यशस्वी यांच्यातील भागीदारीला ब्रेक लावला. त्याने राहुलला आऊट करुन संघाला पहिली विकेट मिळवून दिली.