Shah Bano Biopic: 'शाह बानो'ची कहाणी रुपेरी पडद्यावर मांडणार यामी गौतम

Manish Jadhav

रियल लाइफ चित्रपट

गेल्या काही वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत रियल लाइफवर आधारित चित्रपट बनवणे वाढले आहे. विशेष म्हणजे, अशा चित्रपटांनी प्रेक्षकांना थिएटरकडे आकृष्टही केले आहे.

Shah Bano | Dainik Gomantak

ऐतिहासिक चित्रपट

आता असाच आणखी एक ऐतिहासिक चित्रपट बनणार आहे, ज्यामध्ये यामी गौतम एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Yami Gautam | Dainik Gomantak

शाह बानो प्रकरण

या चित्रपटात शाह बानो प्रकरणाची कहाणी दाखवण्यात येणार असून आर्टिकल 370 मधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी यामी गौतम महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Yami Gautam | Dainik Gomantak

यामी गौतम

सर्वोच्च न्यायालयात लढवण्यात आलेल्या मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाह बानो बेगम खटल्यावर चित्रपट बनवला जाणार आहे, ज्यामध्ये यामी गौतम 62 वर्षीय मुस्लिम महिला शाह बानो बेगमची भूमिका साकारणार आहे.

Yami Gautam | Dainik Gomantak

पोटगी

पती मोहम्मद अहमद खान यांनी तिहेरी तलाक दिल्यानंतर शाह बानोने सर्वोच्च न्यायालयात कलम 125 अंतर्गत पोटगीसाठी याचिका दाखल केली होती.

Shah Bano | Dainik Gomantak

हवाला

शाह बानोच्या पतीने मुस्लिम पर्सनल लॉ चा हवाला देत त्यावेळी म्हटले होते की, भरणपोषण फक्त इद्दतच्या काळातच दिले जाते. ही कायदेशीर लढाई सात वर्षे चालली. एप्रिल 1985 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शाह बानोच्या बाजूने निकाल दिला होता.

Shah Bano | Dainik Gomantak

दिग्दर्शन

यामीच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुपरन वर्मा करणार आहेत, ज्यांनी 'फॅमिली मॅन सीझन 2' बनवला आहे.

Yami Gautam | Dainik Gomantak
Jemimah Rodrigues
आणखी बघा