Manish Jadhav
भारत आणि आयर्लंडच्या महिला संघांमध्ये सध्या 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघ राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर एकमेकांसमोर आले. या सामन्यात जेमिमाचा जलवा पाहायला मिळाला.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, जेमिमाने शतक झळकावले. तिचे हे कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक आहे.
आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने शतक झळकावले. तिने 91 चेंडूंचा सामना करत 112.08 च्या स्ट्राईक रेटने 102 धावा केल्या.
यादरम्यान जेमिमाने 12 चौकार लगावले. तिचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये तिने टी-20 मधून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली.
12 मार्च 2018 रोजी जेमिमाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. म्हणजेच जेमिमाला तिचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकण्यासाठी जवळजवळ 7 वर्षे लागली.
जेमिमाने आतापर्यंत टीम इंडियासाठी 41 सामने खेळले आहेत. या सामन्यांदरम्यान तिने एकदिवसीय सामन्यात 1000 धावाही पूर्ण केल्या.
जेमिमाने भारतासाठी 3 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने 3 अर्धशतकांसह 235 धावा केल्या आहेत. याशिवाय, टी-20 मध्ये त्याने टीम इंडियासाठी 107 सामन्यांमध्ये 2267 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 12 अर्धशतके देखील समाविष्ट आहेत.